पनवेल महापालिकेच्या सुका कचरा संकलन पासबुक योजनेमध्ये कारमेल शाळा आघाडीवर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महापालिकेच्या सुका कचरा संकलन पासबुक योजनेमध्ये कारमेल शाळा आघाडीवर


*पनवेल महापालिकेच्या सुका कचरा संकलन पासबुक योजनेमध्ये कारमेल शाळा आघाडीवर*
पनवेल : 
पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्व महापालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांना पटवून देऊन ‘सुका कचरा संकलन पासबुक योजना महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कळंबोली येथील कारमेल कॉन्व्हेंट शाळेने सर्वात जास्त प्लास्टिक गोळा केले असून यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कळंबोली प्रभागामधील कारमेल शाळेने आजवर सर्वांत जास्त म्हणजे एक हजार तीनशे तीस किलो प्लास्टिक (ड्राय वेस्ट)गोळा केले आहे. या शाळेचे महापालिकेच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे.
मागील तीन महिन्यापुर्वी ‘सुका कचरा संकलन पासबुक योजनेचा’ शुभारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये घनकचरा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये करण्यात आला होता. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी विविध शाळांच्या मुख्यध्यापकांना या योजनेमध्ये सामिल होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चारही प्रभागांमधून उत्तम प्रतिसाद मिळत असून दर गुरूवारी वेळापत्रकाप्रमाणे शाळांमध्ये प्लास्टिक गोळा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने गाडी पाठविण्यात येत आहे. यामध्ये कारमेल शाळेने आजवर उच्चांकी असे प्लास्टिक गोळा करून दिले आहे.
    युनीसेफ आणि सीएसीआर कंपनीच्या मार्फत हे प्लास्टिक गोळा केले जात आहे. सीएसीआर कंपनीचे प्रतिनिधी नितिन वाधवानी यांनी या गोळा केलेल्या प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून पुर्नवापर करून तयार करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू या पुन्हा त्या शाळांनाच देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.   
या स्पर्धेमध्ये दोन हजारपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना युनीसेफ आणि महापालिकेच्यावतीने प्रशस्ती पत्रक देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेस पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0