कळंबोली शहरात दिवसाढवळ्या घरफोडी : १९ तोळे सोने लंपास - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोली शहरात दिवसाढवळ्या घरफोडी : १९ तोळे सोने लंपासकळंबोली शहरात दिवसाढवळ्या  घरफोडी :  १९ तोळे सोने लंपास 

कळंबोली / प्रतिनिधी
संतोष मोकल


  कळंबोली शहरात   दिवसाढवळ्या झालेल्या  घरफोडीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या प्रकारामुळे शहरातील  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
  दिनांक 23 रोजी सकाळी 11 ते 3 च्या दरम्यानं ही चोरीची घटना घडल्याने या घटनेने खळबळ व्यक्त केली जात आहे .
 कळंबोली सेक्टर 4 इ परिसरातील एफ टाईप परिसरात राहणाऱ्या राजश्री सचिन सुळ कुटुंबीयांच्या घरात दिवसाढवळ्या घरफोडी करून तब्बल 19 तोळे सोने अज्ञात चोरट्यानीं लंपास केले आहे .
   कळंबोली शहरातील एफ टाईप येथील बिलिंग नंबर 1 रूम नंबर 3 याठिकाणी ही घरफोडी झालेली असून या घटने बाबत
कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे   कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत .
  घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील रोखी सह 19 तोळे सोने सीताफीने घेऊन चोरट्यानीं पोबारा केला आहे .
  एकूण 9 लाख 12 हजार 700 रुपये किमतीच्या ऐवज असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.. 
   कळंबोली शहरांमध्ये सध्या चोरीचे प्रमाण वाढत कळंबोली  शहरातील नागरिकांच्या नुसार शहरातील उभ्या असलेल्या वाहनांचे टायर , इमारतींच्या आवारातील महागडया वस्तू  दिवसाढवळ्या लंपास केले जात असल्याचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे .
  शहरात घडलेल्या या घटने नंतर संपूर्ण कळंबोली शहरात एकच खळबल उडाली आहे . 
कळंबोली पोलीस ठाण्यात कलम 454 व कलम 380 अंतर्गत अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 कळंबोली पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत असून लवकरच नवी मुंबई पोलिसांना या चोरीची उकल करण्यास यश प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्क्त केला जात आहे .
 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0