खारघर क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या ठरावावरती महापालिका ठाम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

खारघर क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या ठरावावरती महापालिका ठाम





 खारघर  क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या ठरावावरती महापालिका ठाम*
पनवेल :  
पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायत यांनी  2005 साली संपूर्ण खारघर गाव व कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारीत केला होता. पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायतीचा हा ठराव महानगरपालिकेने अधिक्रमित केला नाही. त्यामुळे हे लोकोपयोगी धोरण व्यपगत झालेले नाही. त्यामुळे सदर पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत आज झालेल्या प्रशासकिय महासभेमध्ये मंजूरी देण्यात आली.
        आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रशासकिय महासभा मुख्यालयात संपन्न् झाली. यावेळी उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय जगताप , सहाय्ययक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सचिव तिलकराज खापरर्डे महापालिका अधिकारी उपस्थित होते.
      महानगरपालिकेची स्थापना ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली तेव्हा पुर्वाश्रमीची पनवेल नगर परिषद व २३ ग्रामपंचायतीमधील २९ महसुली गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खारघर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायतीने 2005 साली संपूर्ण खारघर गाव व कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारीत केला होता.

 सद्यस्थितीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांनी  पूर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदी करणेबाबत पालिकेला निवेदन दिले आहे. खारघर ग्रामपंचायतीने दारूबंदीबाबत केलेल्या  ठराव महापालिकेने अधिक्रमित केला नसल्याने ग्रामपंचायतीचे लोकपयोगी धोरण व्यपगत हेाण्याचा प्रश्न येत नसल्याने सदर धोरणास प्रशासकिय महासभेत या विषयास मान्यता दिली आहे.
आज झालेल्या ठरावानुसार महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायत क्षेत्रसिमीत खारघर ग्रामपंचायत पुर्व बाजू-खारघर से.१७ संपूर्ण, से.१६ पूर्व बाजू (खाडी लगत), सायन पनवेल हायवेवरील पूल, ओमकार एम्पायर इमारत से.१०, मानसरोवर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडी ते पनवेल महानगरपालिका हद्दीपर्यंत, खारघर ग्रामपंचायत पश्चिम बाजू - पनवेल महानगरपालिका खारघर गावाची पश्चिम दिशेकडील महसुल हद्द, खारघर टेकडी, खारघर हिल, फणसवाडी, खारघर व्ह्युव पॉईंट, चाफेवाडी,  खारघर ग्रामपंचायत उत्तर बाजू- चाफेवाडी गाव, खारघर टेकडी ते खारघर व्ह्युव पॉईंट, गोल्फ कोर्स रोडने सी.जे.एम.शाळा सिअमय इमारत ते ग्राम विकास भवन, खारघर से.०६, भुखंड क्र.८,१३,१४ से. २१, भुखंड क्र.८५ से.२१, निलमकुंज भुखंड क्र.१५१ (प्रस्तावित महापौर बंगला), खारघर से. २०, , प्लॉट नं.८० ते प्लॉट नं. ८५,७७,७७ए,५७,५६,५२, ५१, भुखंड क्र.८६ ते ९५ से.१९, भुखंड क्र. ११ब, ११अ, भुखंड क्र. २३४ ते २४३, खारघर ग्रामपंचायत दक्षिण बाजू- मानसरोवर, खारघर रेल्वे ब्रिज, तळोजा खाडीने पनवेल महानगरपालिका हद्दीपर्यंत खारघर गावाची दक्षिणेकडील महसुल हद्द या चतु:सिमा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या क्षेत्रासाठी सर्व प्रकारच्या किरकोळ व घाऊक मद्यविक्री व साठा करण्यास परवानगी असणार नाही.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0