समाजिक भोंडला कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल :
कळंबोली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञानमंदिर
यांच्या वतीने भोंडला कार्यक्रम पार पडला .
आपली परंपरा जोपासात या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळी छबी विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली .
या विद्यालयाने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे झाले. सामाजिक भोंडल्या निमित्ताने विद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक हितचिंतक, शाळेला सहकार्य करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व संस्थापकांच्या प्रतिमा पूजनाने व इशस्तवन गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संजना बाईत मॅडम यांनी केले.
विद्यालयाचे संगीत शिक्षक संतोष पाटील सर आणि विद्यार्थी यांनी विविध गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यालयाच्या शिक्षिका तायडे यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक साहित्यापासून तयार केलेल्या हत्तीच्या पूजनाने भोंडला या कार्यक्रमास सुरुवात झाली.
भोंडल्याची गाणी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फडके मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बाईत मॅडम व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी गायली. गाण्याच्या तालावर सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्त्री पालक प्रतिनिधी ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भोंडल्याच्या नाच गाण्यांमध्ये सहभाग घेऊन विद्यालयाचे वातावरण उल्हासित केले.
विद्यालयाकडून सर्व माजी विद्यार्थी हितचिंतक या सर्वांना भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष देवदत्त भिसीकर सर व महामात्र गोविंद कुलकर्णी उपस्तित होते.