पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिपावली सानुग्रह मंजूर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिपावली सानुग्रह मंजूर

*पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिपावली सानुग्रह मंजूर*
पनवेल: 
पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिपावलीसाठी सन 2021 -2022 चा सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत हा सानुग्रहाचा विषय मंजूर करण्यात आला.
    पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच पुर्वाश्रमीच्या समाविष्ट 23 ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेले 32 कर्मचारी यांना 25 हजार  सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आला आहे. तसेच कंत्राटी  तत्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेले अधिकारी –कर्मचारी, परिश्रमिक कर्मचारी, राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी, आशा वर्कर्स-गट प्रवर्तक तसेच शिक्षण विभागातील शिक्षक यांना 5 हजार  प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे . 240 व त्याहून अधिक दिवस काम केलेल्या एकुण 901 पात्र कर्मचा-यांना महापालिकेने प्रस्तावित केलेला सानुग्रह देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0