राजकीय , समाजिक , व्यपारीवर्ग एकवटाला
लढवय्या रोखठोक : संतोष मोकल
कळंबोली शहरात शनिवार दिनांक 8 व रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे .
नवीमुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कळंबोली पोलीस ठाणे आयोजित या शिबिरासाठी कळंबोली शहरातील राजकीय , समाजिक तसेच व्यापारी वर्गाने
या शिबिरात हिरहिरीने सहभाग नोंदवीला असून
मोठ्याप्रमाणात नागरिकांना या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देऊन जनजागृती करण्यात येत आहे .
नवीन सुधागड शाळा कळंबोली या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमात नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग उपस्थित राहणार असून पनवेल झोन 2 सह कळंबोली पोलीस सज्ज झाले आहेत .
शेकडो नागरिक या शिबिरात सहभाग घेणार असून
हे रक्तदान शिबीर नसून उत्सव असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.