समाजसेविका विजया कदम यांचा महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने गौरव . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

समाजसेविका विजया कदम यांचा महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने गौरव .


समाजसेविका विजया कदम यांचा  महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने गौरव .

कर्जत : लढवय्या रोखठोक

कळंबोली शहरातील समाजिक कार्यकर्त्या तसेच सर्व सामान्यांसाठी सदैव सहकार्यांची भावना मनात ठेऊन सतत समाजासाठी आपण काही देणे आहोत , असे ठरवून झटतं असणाऱ्या विजया कदम यांना अजून एक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . 
सामाजिक कार्यात स्व:ताला झोकून प्रत्येक क्षेत्रात अगदी निर्भीडपणे काम करणाऱ्या विजया चंद्रकात कदम  (संस्थापक :- स्त्रीशक्ती फांउडेशन) यांना साई आधार सोशल हेल्प फाउंडेशन, नाशिक यांच्या कडून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल  दिनांक १८/१०/२०२२ रोजी कर्जत येथे  " *महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्कार* "  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  संजय देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी  महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यामधून सामाजिक क्षेत्रातील व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी हे सर्व पुरुष असून देखील त्यांनी स्त्रियांचा सन्मानार्थ "महाराष्ट्र हिरकणी पुरस्कार" हा महाराष्ट्रातील विविध जिल्हातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्रियांना देण्यात आला .
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य रायगड भूषण ह भ प श्री दादा महाराज राणे,
योग गुरु डॉ. प्रज्ञा पाटील(योगा गुरू,गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर)  जानकी पराग नाईक(समाजसेविका मानवाधिकार चळवळ), डॉ.  पुनम उमेश बिरारी( मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल,मिसेस महाराष्ट्र), राजयोगिनी कुमारी सरला दीदी(प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कोपरगाव), 
SP वर्षा देविदास घेवारे (अप्पर पोलीस अधीक्षक CID, पुणे)
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती
विजय शंकर धरत (संस्थापक अध्यक्ष साई मंदिर, जिते ता. कर्जत, जि. रायगड)
राजेश वसंत माळी(सीनीयर मॅनेजर, टाटा मोटर्स, पुणे)
मनिषा विजय घरत(अध्यक्ष महिला बचतगट, सावसमिती, जिले, ता. कर्जत, जि. रायगड),       संतोष दुंदाराम जाधव(अध्यक्ष द्वारकामाई साई मंदिर संस्था मा.सरपंच, आमणे पाडा, ता. भिवंडी जि.ठाणे),
रामराव मोतीराम शिंदे(प्रोप्राइटर, विकास एंटरप्रायसेस,नाशिक) कल्पना रोहिदास सोनार (अध्यक्ष राधिका फाऊंडेशन नाशिक), विजयालक्ष्मी आहिरे(मा. शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.नाशिक रोटरी मेंबर (मालेगांव)
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0