छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या हॉटेलवर कारवाईची मागणी .
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
पनवेल :
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राच्या माध्यमातून अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या
पनवेल जिल्हा महिला आघाडीच्या प्रियंका विनोद गाडे यांनी केला असून याबाबत पनवेल महापालिका तसेच
पोलीस आयुक्त कार्यालयात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी पनवेल जिल्हा महिला आघाडी च्या प्रियांका गाडे यांच्या तक्रारीनुसार
पनवेल येथील सरोवर हॉटेल या ठिकाणी हॉटेलच्या भिंतीवर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटण्यात आले . मात्र या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आली असून त्या चित्राच्या माध्यमातून महाराजांचा अवमान होत असल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटलेल आहे.
व त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मत गाडे यांनी पत्रात व्यक्त केल असून याप्रकरणी संबंधित हॉटेल व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रियंका गाडे यांनी केली आहे , मात्र तक्रार दाखल होतच
संबंधित हॉटेल व्यवसायिकांना या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली असून सदर महाराजांचे चित्र हवण्यात आले आहे .
कोट :
संबंधित हॉटेल व्यवसायिकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे चित्र भिंतीवर रेखाटले असून त्यातून मोठ्या चुका करून
महाराजांचा अवमान होत असल्याचे निदर्शनात येत असल्याने याबत आम्ही तक्रार केली असून तात्काळ या बाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे .
तक्रारदार
प्रियांका गाडे
पनवेल राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस आघाडी