मृतदेहांची अदला बदल
अलिबागचा मृतदेह पनवेलला ;
पनवेल : प्रतिनिधी
नावात आणी चेहऱ्यात साम्य असल्याने ऐका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे .
राम पाटील व रमाकांत पाटील
यांना उपचारासाठी कळंबोली येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला .
कळंबोली एमजीएम रुग्णालयात
असलेल्या शवागृहात ही अदला
बदली होऊन हा गोंधळ उडाला .
विश्वसनीय सूत्रांच्या तसेच मृत नातेवाईकांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार समोर आला आहे .
अलिबाग येथील पेझारी गावातील रमाकांत पाटील यांचा मृतदेह सोमाटने दहिवली येथे व सोमाटणे येथील राम पाटील यांचा मृतदेह अलिबागला असा धक्कादायक प्रकार घडला .
शवागृहात मृतांवर लावलेले नावाचे इंग्रजी अक्षरांचे लेबल मुळे शवागृतातून
ही अदला बदल झाल्याचे समोर आले. पनवेल चा मृतदेह अलिबाग ला व अलिबागचा पनवेल ला असा प्रकार घडला
असल्याचे स्पष्ट होत असून नातेवाईक यांना देखील त्याचवेळी त्यांच्या योग्य व्यक्तीची ओळख पटली नाही व त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे .
एमजीएम व्यवस्थापानाच्या वतीने
रमाकांत व राम यांच्या मृतदेहावर इंग्रजी अक्षर आर या नावाने लावलेले लेबल मुळे व चेहऱ्यात साम्य वाटत असल्याने नातेवाईकांणी देखील चुकीचा मृतदेह घेतला असल्याचा अंदाज आहे . मात्र या प्रकारामुळे एमजीएम रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे .
हा सर्व प्रकार मंगळवारी ( ता.27) घडला आहे.
अलिबाग येथील पेजारी गाव येथे राहणारे रमाकांत पाटील यांना सोमवारी ( ता.26) कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात नेण्यात आले होते.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने रात्रभरासाठी पाटील यांचे शव रुग्णालतील शवगृहात ठेवण्याचा निर्णय रमाकांत यांच्या नातेवाईकांनी घेतला होता .याच वेळी शवगृहात पनवेल तालुक्यातील सोमाटणे दहिवली येथील राम पाटील यांचा देखील मृतदेह ठेवण्यात आला होता..
*रुग्णालय प्रशासनाकडून या प्रकारची पाठराखण केली जात आहे एमजीएम रुग्णालय प्रशासनाकडून असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले .
मृतदेह देताना शहानिशा केली जात असल्याचे व मृतदेह बदली झाल्याचा प्रकार शीतगृहातच लक्षात आल्याने तात्काळ चुक सुधारण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.