महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन
अध्यक्षपदी आनंद पाटील यांची निवड : बांधकाम व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेची वज्रमुठ.
नवीमुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईमध्ये कार्यक्षम असणाऱ्या महाराष्ट्रीयीन बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची नुकतीच निवड झाली यावेळी परिसरातील मराठमोळे तसेच भूमिपुत्र बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते .
सर्व लहान मोठ्या बांधकाम व्यवसायिकांना घेऊन कार्यक्षम काम करत असलेली या संघटनेचा एकोपा यावेळी पाहावयास मिळाला .
या संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या सदस्यांनी व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.
या निमित्त बेलापूर, नवी मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून महासचिव म्हणून हितेश सावंत आणि खजिनदार म्हणून महेश माटे यांची निवड करण्यात आली. आनंद पाटील यांनी मावळते अध्यक्ष संतोष आंबवणे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी असोसिएशन ची पुढची वाटचाल कशी असेल सांगितले.
शहरे विकसित करत असताना बऱ्याचदा बाहेरील बांधकाम व्यवसायिकां कडून येथील स्थानिक विशेषतः मराठी बांधकाम व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असते यासाठी त्यांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत राहून अशा बांधकाम व्यवसायिकांना एक आधार देऊन त्यांच्या मागे भक्कम आधार देण्याचे काम महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन करत राहील असे अध्यक्ष आनंद पाटील यांनी सांगितले. सर्वसामान्यांना आमच्या संघटनेच्या एकाही बांधकाम व्यावसायिका कडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही व फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात आमची संघटना कडाडून विरोध करून त्रयस्थ गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ सदस्य श्री.संग्राम पाटील, .के. के. म्हात्रे, मधू पाटील तसेच माजी महासचिव बाबासाहेब भोसले आणि खजिनदार लक्ष्मण साळुंखे तसेच मीडिया प्रमुख राजेन्द्र कोलकर, प्रवीण शेट्ये, अजित येलमार, आशिष कवडे , सुनील ठोंबरे, उत्तम येलमार, संजय इंगळे आणि पवन देवलकर आदी सदस्य उपस्थित होते.
जवळ पास ११५ मराठी व
अमराठी बांधकाम व्यावसायिक या संघटनेत कार्यरत असून संघटनेत येणाऱ्या सदस्याचा ओघ कायम असून नवीन बांधकाम व्यावसायिकांना या संघटनेच्या माध्यमातून नेहमी सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .