ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे यांचा केंद्राकडून गौरव - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे यांचा केंद्राकडून गौरव

ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे यांचा केंद्राकडून गौरव  
उरण | वार्ताहर |

शून्यकचरा व्यवस्थापन नियोजनात धुतुम ग्रामपंचायत ने बाजी मारली असून येथील   ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे
 यांचा केंद्रासरकार कडून गौरव करण्यात आला आहे.
 कार्यक्षम ग्रामविकास अधिकारी म्हणून विनोद मोरे यांच्याकडे  पाहिले जाते त्यांनी आज पुन्हा हे सिद्ध करून दाखवले आहे .
केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने २२ ते २४ सप्टेंबर पर्यंत पुणे येथे कचरा व्यवस्थापना बद्दल कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेत महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दखल घेण्यात आली आहे. 
पुणे येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेत देशातील विविध राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आले होते . यावेळी धुतुम ग्रामपंचायत करत असलेल्या कचरा निर्मूलनाची चित्रफित दाखविण्यात आली होती .दोन वर्षांपूर्वी 26 लाख  रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात येऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जात आहे या पुरस्काराने धुतुम ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात येत आहे .
   इतर ग्रामपंचायतीने देखील असे प्रकल्प  राबविणे गरजेचे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मूलन होण्यास मदत होईल .
या गौरवामागे
धुतुम ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक विनोद मोरे यांच्यासह सरपंच रेशमा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर यांचे देखील मोलाचे सहकार्य असल्याचे विनोद मोरे म्हणाले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0