इंडियन स्वच्छता लीग’ रॅलीमध्ये सहभागी व्हावे आयुक्त गणेश देशमुख - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

इंडियन स्वच्छता लीग’ रॅलीमध्ये सहभागी व्हावे आयुक्त गणेश देशमुख


तरूणांनी मोठ्या संख्येने ‘इंडियन स्वच्छता लीग’ रॅलीमध्ये सहभागी व्हावे आयुक्त गणेश देशमुख
17 सप्टेंबरला खारघर, कळंबोली, पनवेलमध्ये भव्य  रॅलीचे आयोजन*
पनवेल : लढवय्या रोखठोक

केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजन दिनांक 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वछतेमध्ये तरूणांचा सहभाग वाढवा , शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे दृष्टीने या उपक्रमांनिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबरला खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीगच्या’ रॅलीमध्ये तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.
     केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ‘स्वच्छ भारत’ अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभावी अमंलबजावणी सुरु आहे. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने आपली ‘पनवेल चॅम्पियन्स’ ही टिम तयार केली असून पनवेलमधील प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या टिमची कॅप्टन असणार आहे. 
      स्वच्छ व सुंदर शहराचे निर्माण व्हावे या उद्देशाने या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्याच्या दृष्टीने भव्य सायकल रॅली आणि पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 17सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजता खारघरमध्ये, कळंबोली,पनवेलमध्ये अशा तीन ठिकाणी  रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये तरूणांनी सहभागी होण्यासाठी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.
         या भव्य रॅलीच्या नियोजनासाठी उपायुक्तांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सायकल रॅली,पदयात्रेच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात येणार आहे. या रॅलीसाठी 50 हजार युवकांचे लक्ष्य् महापालिकेने ठेवले आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


चौकट
महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये, महाविद्यालयांच्या बाहेर या उपक्रमांचे फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांवरती क्यू आर कोड आणि लिंक दोन्ही असणार आहेत. फलकावरील क्यू आर कोडला स्कॅन केले असता, उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठीची  रजिस्ट्रेशन लिंक ओपन हाणार आहे. या माध्यामांचा वापर करून जास्तीत जास्त तरूणांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.
चौकट
प्रभाग समिती रॅलीचा मार्ग रॅलीचा प्रकार वेळ 
खारघर उत्सव चौक ते गुरूद्वारा सायकल रॅली व स्वच्छता मोहिम सकाळी 7:30
कळंबोली पोलिस निवारा केंद्र ते लेबर नाका पदयात्रा व स्वच्छता मोहिम सकाळी 7:30
पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पदयात्रा व स्वच्छता मोहिम सकाळी 7:30

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0