तळोजा : प्रतिनिधी
तळोजा औद्योगिक वसाहतीतील मोदी केमिकल फार्मा प्लॉट १०३ केमिकल झोन येथे असलेल्या लिमिटेड कंपनीला अचानक आग लागली आहे. सायंकाळी अंदाजे ७ च्या सुमारास ही घटना घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत असून कोणत्या प्रकारची जीवित हानी न झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .
तळोजा अग्निशामक दलाच्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.