महावितरणाचा कळंबोलीकरांना शॉक : गणेशोत्सवाची सुरवात विजेविना : मागील काही तासापासून कळंबोली अंधारात
कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली शहरातील काही भागात तब्बल ३ तासाहून अधिक काळ लोटून सुद्धा विज पुरवठा खंडित असल्याने येन सणं सुदीच्या आनंदाच्या दिवसात नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला असून नागरिक हैराण झाले आहेत .
वारंवार कळंबोली शहरात विजेचा सुरु असलेला लपंडाव पाहता या ठिकाणी वाढीव विजबिले व खंडित विजपुरवठाच रहिवासियांच्या पाचवीला पुजला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत .
मुख्य केबल च्या अचानक बिघडामुळे विज पुरवठा खंडीत असल्याचे महावितरणाचे अधिकारी सोनावणे यांनी सांगितलं असून अद्याप किमान ३ तास विज पूरवठा सुरळीत होण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .
इतर वेळी विज पूरवठा दिवसा खंडित न होता रात्री च्या वेळेसच खंडित होत असल्याने
मोठ्या अडचणी निर्माण होत असून महावितरणाच्या वतीने वेळोवेळी देखभाल दुरुस्तीचे कामे होत नसल्यानेच असे मोठे काम निघत असल्याची माहिती मिळत आहे .
महानगरपालिका शहरांना स्मार्ट शहरांकडे घेउन जात असताना महावितरण केव्हा स्मार्ट होणार असा प्रश्न विचारला जात आहे .