नागरिकांच्या समस्ये बाबत कळंबोलीत स्वाक्षरी मोहीम . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नागरिकांच्या समस्ये बाबत कळंबोलीत स्वाक्षरी मोहीम .

नागरिकांच्या समस्ये बाबत
कळंबोलीत स्वाक्षरी मोहीम .
कळंबोली : प्रतिनिधी

कळंबोली पोलिस स्टेशन ते सत्यम ज्वेलर्स
(सेक्टर २ पासून ते से. २ई) आणि सत्यम ज्वेलर्स ते राम मंदिर(सेक्टर १) मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे व रस्त्याचे दिवेही (विजेचे खांब) खुप वर्षांपासून बंद आहेत
या समस्ये वर नगरसेवक विजय खानावकर यांनी या समस्याची गांभीर्य लक्षात घेता स्वाक्षरी मोहीम राबिवली व या बाबत सिडको प्रशासनाकडे या तक्रारींचे निवारण होण्यासाठी अर्ज सादर केला आहे .  श्री मित्र मंडळ सभामंडप, शिल्पा मेडिकल नाका आणि राम मंदिर परिसरातही दिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने ही गैरसोय दूर होण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे .
खानावकर   यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे स्वागत केले जात आहे. 
हे निवेदन सिडको अधिकाऱ्यांकडे सोपवून 
या प्रलंबित मागण्या लवकरच पुर्ण होतील, 
असे संबंधित विभागाने सांगितले आहे.

   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0