स्त्री शक्ती फाउंडेशन च्या पाठपुराव्याने मलनिसारण वाहिन्यांची दुरुस्ती
नवचैतन्य सोसायटीच्या रहिवाशांनी मांडले आभार
कळंबोली /प्रतिनिधी
कळंबोली सेक्टर ५ नवचैतन्य सोसायटीच्या आवारात असलेल्या सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबून पूर्ण मलनिसारण पाणी सोसायटीच्या आवारात तुंबत असल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी दुर्गंधी तसेच आरोग्यासाठी हानिकारक वातावरण निर्माण झाल्याने येथील नागरिक हैराण झालेले होते.याबाबत स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांनी पाठपुरावा करून अखेर महापालिका तसेच सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरून हे काम मार्गी लावल्याने नवचैतन्य सोसायटीतील रहिवाशांनी विजया कदम यांचे आभार मानले.
मागील गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कळंबोली परिसरातील बऱ्याच भागातील मलनिसरण वाहिन्या तुंबत आहेत त्याचप्रमाणे नवचैतन्य सोसायटीत या ठिकाणी देखील हाच प्रकार घडत होता याची वारंवार तक्रार पनवेल महापालिका तसेच संबंधित विभागाला करून देखील कोणतेही दखल घेतली जात नव्हती. मात्र अखेर विजया कदम यांच्या पाठपुराव्याने तसेच सोसायटीतील अध्यक्ष दत्ता ठाकूर
सेक्रेटरी दिनेश खुटाळ यांच्या प्रयत्नाने अखेर सोसायटीतील तुंबलेल्या मलनिसारण वाहिन्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम यांनी महापालिकेकडे या वाहिन्या तुंबण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की पावसामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र संपूर्ण भरलेले असल्याने मल निसारण वाहिन्या तुंबत आहेत अशी उडवा उडवी ची उत्तर मिळत होती. मात्र वस्तुस्थिती त्याठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम यांनी जाऊन पाहिले असता मल सांडपाणी प्रक्रिया केंद्र संपूर्ण रिकामे होते व याचे संपूर्ण फोटो व संपूर्ण माहिती गोळा करून पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या खोट्या प्रकाराची पोलखोल केल्यानंतर आयुक्तांनी अखेर संबंधितांना आदेश देऊन तात्काळ हे काम मार्गी लावण्याचा सूचना दिल्यानंतर येथे कारवाई करण्यात आलेली आहे. व त्यामुळे समाधानकारक काम झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा नीश्वास सोडला.