समाजसेविका विजया कदम यांच्या पाठपुराव्याने कळंबोलीतील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती
कळंबोली : संतोष मोकल
कळंबोली डिमार्ट , झूडिओ तसेच शहरातील मुख्य मार्गावर खडतर झालेले रस्ते व त्यांची दुरावस्था त्याच प्रमाणे रस्त्यावर झालेल्या खड्यांच्या दुरावस्थे बाबत कळंबोली शहरातील समाजसेविका विजया कदम यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाने येथील खड्डे व रस्त्याची डागडुजी केली आहे .
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे यामुळें मोठे अपघात घडत होते व यावर वारंवार तक्रारी देऊन दखल घेतली जात नसल्याने अखेर
रस्ते दुरुस्ती बाबत सिडको ला जाब विचारला असता त्यांना निवेदन देण्यात आले यानंतर लगेच आज सिडको चे अधिकारी यांनी स्वतः दखल घेऊन
सर्व रस्त्यांची पाहणी केली व
रस्त्यांची कामे सुरू केली .