उरण पंचायत समिती बाहेर उपोषण सुरू ग्रामविकास अधिकारी वैभव पाटीलांच्या निलंबनाची मागणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उरण पंचायत समिती बाहेर उपोषण सुरू ग्रामविकास अधिकारी वैभव पाटीलांच्या निलंबनाची मागणी

उरण पंचायत समिती बाहेर उपोषण सुरू
 ग्रामविकास अधिकारी वैभव पाटीलांच्या निलंबनाची मागणी

उरण : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

उरण समिती कार्यालयाबाहेर अखेर बांधपाडा 
ग्रामपंचायत समस्यांनी ठिय्या मांडून उपोषणाला सुरवात केली आहे .
 गेल्या काही महिन्यांपासून बांधपाडा ग्रामपंचायत  गैरव्यवहार , भ्रष्टाचार बाबत ग्राम विकास अधिकारी वैभव पाटील यांच्या कामकाजाबाबत पुराव्यासहित गैरव्यवहार चव्हाट्यावर येथील सदस्यांनी आणून दिला . याबाबत रायगड जिल्हा परिषद , कोकण आयुक्त यांच्या दालनात ग्राम विकास अधिकारी वैभव पाटील यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.
 मागील आठवड्यात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने त्याचप्रमाणे  कारवाईबाबत लेखी उत्तर संबंधित तक्रारदारांना प्राप्त होत नसल्याने , अखेर उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला होता . 
 या अनुषंगाने आज आज दिनांक ८ जून रोजी उरण पंचायत समिती कार्यालयाबाहेर उपोषण कर्त्यांनी उपोषण करण्यासाठी सुरुवात केली.
   उरण पंचायत समिती बाहेर सुरु असलेल्या या उपोषणाने आत्तापर्यंत पाठीशी घातलेल्या ग्राम विकास अधिकारी यांना मिळालेल्या अभयानंतर आता नक्की कारवाई होणार का ? व कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार ? याकडे आता लक्ष लागलेले आहे.
   उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून पदभार सध्या पनवेलचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला असून सध्या या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी संजय भोये यांच्या वर येऊन ठेपली आहे.
  आतापर्यंत ग्राम विकास अधिकारी वैभव पाटील यांना उघडपणे विरोध करणे कोणाला शक्य नव्हते, मात्र बांधपडा  ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीच आज त्यांचा भ्रष्टाचार उघड करून पाटील यांच्या विरोधात उघडपणे उपोषण करून दाखवल्याने वैभव पाटील यांच्यावर तक्रारी करणारे इतर सर्व तक्रारदार आता सक्रिय झाले आहेत .व ते देखील उपोषण कर्त्यांनासोबत सहभागी होत आहेत .
 या प्रकरणी पाटील यांच्या विरोधात रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत कारवाईचे आदेश पारित करण्यात आल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून देखील तात्काळ कारवाई होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजगी दाखवली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0