आयुक्त गणेश देशमुख यांचा कळंबोली मध्ये दौरा : विकास कामांना मिळणार गती
प्रतिनिधी : संतोष मोकल
पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कळंबोली प्रभागाला भेट देऊ देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यादरम्यान पाहणी दौरा करून होऊन संपूर्ण परिसराचा आढावा घेतला.
यावेळी नागरिकांनी आयुक्तांचे स्वागत केले कळंबोली प्रभाग १० या ठिकानी असलेल्या समस्या आयुक्त यांनी जाणून घेतले. नगरसेवक रवींद्र भगत यांनीदेखील त्यांचे प्रश्न आयुक्तांसमोर ठेव घेऊन त्यावर विचार करण्यास भाग पाडले.
यावेळी रवींद्र भगत यांच्या मागणी नुसार सेक्टर १ उघडा असलेला नाला बंद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले .
तसेच नाल्यातील गाळ तात्काळ काढावा अशी विनंती राहिवासीयांनी केल्यानंतर त्यावर सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांकडून मिळाला हागाळ पावसाळ्यापूर्वी तत्काळ काढण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले .
याच ठिकाणी लागून असलेल्या छत्रपती शिवाजी क्रीडांगण याचं पुनर्विकास करून मिनी स्टेडियम बनवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले असून शहरातील उघड्यावर असले नाले कारमेल शाळेला लागून असलेला नाला हा देखील साफसफाई करून बंदिस्त करण्यात येईल असे आयुक्त त्यांनी आश्वासन दिले.
आयुक्तांच्या दौऱ्यानंतर
कळंबोलीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . कळंबोली सेक्टर २ व २ ई येथील उद्याने सुशोभीकरण करून लहान मुलांच्या खेळण्यासाठी लागणारे साहित्य देऊन सुसज्ज असे उद्यान निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक गोपाळ भगत यांच्यासह कळंबोलीतील अनेक महिला रहिवासी उपस्थित होते.