भाड्याने राहणाऱ्यांना मरण महाग :
कामोठे स्मशानातील प्रकार
कामोठे : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीत सध्या अंत्यविधी देखील महाग होऊन बसली आहे .
अंत्यविधीसाठी शहरातील मूळ रहिवासी मालक असेल तर म्हणजेच त्याचे स्वताचे घर असेल तर अंत्यविधीसाठी त्याच्या कुटुंबीयांना २५०० व भाड्याने वास्तव्यास असणाऱ्या जवळपास ४२०० रुपये अंत्यविधी दरम्यान आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे .
हा प्रकार कामोठे याठिकाणी घडलेला आहे.
कामोठे सेक्टर १५ याठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत सध्या मृतांच्या नातेवाईकांना या अजब प्रकाराला तोंड द्यावे लागत आहे . स्वतःचे घर असेल तर मरणाच्या विधीमध्ये मुभा मिळत असल्याने भाडेकरू रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मल्याळम समाजाने आवाज उठवला असून
शहरातील कार्यासाम्राट नगरसेवक डॉ अरुण भगत यांना या बाबत कळवले आहे .
पनवेल महापालिकेला लवकरच या गैरनिर्णयाबाबत लेखी निवेदन सादर केले जाणार असल्याचे अरुण भगत यांनी सांगितले .
शहरातील भाडेकरूंनी मारावे तर कसे मरावे असा संभ्रमित सवाल महापालिकेच्या कारभाराने उपस्थित झालेला आहे .