हुवावे आणि वोक्हार्ट फाऊन्डेशनकडून महापालिकेला मोफत रुग्णवाहिका - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

हुवावे आणि वोक्हार्ट फाऊन्डेशनकडून महापालिकेला मोफत रुग्णवाहिका

हुवावे आणि वोक्हार्ट फाऊन्डेशनकडून महापालिकेला मोफत रुग्णवाहिका 
वार्ताहर : नवी मुंबई 
 हुवावे इंडिया ने वोक्हार्ट फाऊंडेशनच्या भागीदारीतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडून यांच्या सीएसआर उपक्रमा अंतर्गत मुंबईतील गरजू लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल मेडिकल क्लिनिक म्हणजेच मोबाईल वैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  मोबाईल क्लिनिक कॉनचे परिचालन सुरूवातीला बोक्हार्ट कडून करण्यात येत होते. या क्लिनिक कडून २ महिन्यांच्या कालावधीत रोज २०० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. याचे डिझाईन है ९६०० रुग्णांना सेवा देण्यायोग्य आहे. जीपीएस ट्रैकिंग सिस्टम ने युक्त या मोबाईल क्लिनिक मध्ये १ डॉक्टर, १ फार्मासिस्ट, १ ड्रायव्हर असून नवी मुंबई, वाशी विभागातील लोकांना मोफत ओपीडी आरोग्य तपासणी, स्थानिक लोकांना उपलब्ध होणार आहे. या क्लिनिक मुळे लोकांना मुलभूत आरोग्य सुविधा, स्वच्छतेविषयी जागरूकता, बाळ आणि मातांचे आरोग्य सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, अयनिमिया, जंतूनाशक मुळे होणारे आजार, एचआयव्ही, सर्पदंश, मधुमेह आणि क्षयरोग यांसारख्या विषयावर जागरुकता निर्माण होणार आहे. या मध्ये असलेल्या सुविधा मध्ये मलेरिया, हिपेटायटिस, डेंग्यू टायफॉईड, रक्तशर्करा, रक्तदाब आणि अन्य आजारपणांचे निदान करण्याच्या किट्स असून त्याच बरोबर विशेष उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात पाठवण्याची सोय ही आहे.
यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर , अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, आरोग्य विभागाच्या डॉ. रत्नप्रभा चहाण, आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद पाटील आणि हुवावे इंडिया चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराणा उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी माहिती देतांना सुखावे इंडिया चे सीईओ डेव्हिड ली यांनी सांगितले “हुवावे ने नेहमीच भारतातील लोकांसह समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषकरून कठीण कालावधीत म्हणजेच जागतिक महामारी मध्ये आम्ही एकत्रपणे कठीण काळ भोगला आहे. म्हणूनच आता वैद्यकीय सुविधामध्ये वाढ होण्याची गरज आहे. वोक्हार्ट बरोबरच्या वा उपक्रमामुळे आम्ही वैद्यकीय सुविधा या अशा लोकांसाठी पढे आणत आहोत ज्यांना वैद्यकीय सुविधा प्राप्त होणे कठीण असते. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणानी युक्त असे हे मोबाईल क्लिनिक म्हणजे गरजूच्या सेवेसाठी मिळालेली एक मोठी संधी आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0