समाज उपयोगी रक्तदान शिबिर संपन्न : मनसे कळंबोली व स्वराज्य संस्थेचा उपक्रम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

समाज उपयोगी रक्तदान शिबिर संपन्न : मनसे कळंबोली व स्वराज्य संस्थेचा उपक्रम

समाज उपयोगी रक्तदान शिबिर संपन्न : मनसे कळंबोली व स्वराज्य संस्थेचा उपक्रम

कळंबोली : संतोष मोकल
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य साधून कळंबोली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच स्वराज्य सांस्कृतिक सेवा मंडळ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही कळंबोली नील संकुल येथे डी वाय पाटील रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत कदम यांच्या सह  नगरसेवक सतीश पाटिल, नगरसेवक रवींद्र पाटील आणि प्रमिला ताई पाटील उपस्थित होत्या तर डी वाय पाटील रक्त पेढीचे डॉ प्राची नायर तसेच शहरातील प्रमुख
 पदाधिकारी उपस्थित होते.
 समाज उपयोगी असे उपक्रम राबवणे हे आमचे ध्येय असून राजकारणापलीकडे समाजकारण कसे करता येईल या धोरणाने आम्ही सतत कार्यरत असून. सामाजिक बांधिलकी आम्ही जोपासत असल्याचे प्रशांत कदम यांनी सांगितले.
  या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद या वेळ मिळाला शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना या वेळी गौरविण्यात आले. 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0