सागर म्हात्रे ठरला मराठी इंडियन आयडॉल : विश्वास म्हात्रे यांचं स्वप्न साकार . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सागर म्हात्रे ठरला मराठी इंडियन आयडॉल : विश्वास म्हात्रे यांचं स्वप्न साकार .

सागर म्हात्रे ठरला मराठी इंडियन आयडॉल : विश्वास म्हात्रे यांचं स्वप्न साकार .

शैलेश चव्हाण : लढवय्या रोखठोक

गेल्या काही महिन्यांपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेला मराठी इंडियन आयडल या कार्यक्रमात नेमका विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती.  मात्र आज अखेर पनवेल उरण चे सुपुत्र सागर विश्वास म्हात्रे याने हा किताब पटकावला आहे.
 सागर याच्या या विजयानंतर त्याचे वडील विश्वास म्हात्रे यांना आनंदाश्रू अनावर झाले असून माझे खऱ्याअर्थाने स्वप्न साकार झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे .
मराठी इंडियन आयडॉल चा किताब  सागर विश्वास म्हात्रे याने पटकावल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालेला आहे .
 गेल्या काही महिन्यांपासून सागर विश्वास म्हात्रे यांनी आपल्या मेहनतीच्या  जोरावर मराठी इंडियन आयडॉल मध्ये सहभाग घेतला व महाराष्ट्राचे लाडके  संगीतकार अजय-अतुल यांच्या मनावर अधिराज्य गाजवून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गायनाच्या जोरावर आपलंसं करून सागर म्हात्रे यांनी आज  इंडियन आयडल चे विजेतेपद मिळवले आहे.
 पनवेल उरण चे सुपुत्र असलेला सागर यांचे वडील विश्वास मात्रे हे शासकीय अधिकारी असून त्यांच्या प्रचंड मेहनतीनंतर आज सागरने आपले स्वप्न साकार केलेले आहे.  सागर म्हात्रे याने इंडियन आयडल मध्ये सहभाग घेतल्यानंतर पनवेल उरण परिसरासह महाराष्ट्रातील त्याच्या हितचिंतकांनी भरभरून मत देऊन सागरला उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे. अत्यंत कष्टातून पुढे आलेल्या या अवलियाचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0