रायगडात कोविड लस दाखल :*
*पनवेलमधीलआरोग्य कर्मचाऱ्यांचे लवकरच लसीकरण*
*पनवेल : लढवय्या रोखठोक*
जगभरासह राज्यात कोविडचा वर्षभरापासून वाढता प्रसार पाहता यावर सुरक्षित मात मिळविण्याकरिता सारीच यंत्रणा , तंत्रज्ञानाने प्रचंड मेहनत घेत अखेर कोरोना वर लस उत्पादित केली असून आता ती सर्वसामान्यांसाठी मिळणार असल्याची आनंदाची बातमी मिळाली आहे .
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाची लस रायगड जिल्ह्याकडे पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आलेली आहे .
ही अतिशय चांगली व सकारात्मक बातमी जिह्याच्या नागरिकांना जिल्हा परिषदेने दिली आहे.
ठाणे जिल्यातून ही लस रायगडकडे आणण्यात आलेली असून दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग , एस डी एच पेण , एस डी एच कर्जत येथील ग्रामीण शहरी भागातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे . त्याच प्रमाणे
एमजीएम कामोठे त्याच प्रमाणे वाय एम टी हॉस्पिटल पनवेल येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे .
पहिल्या टप्प्यात दिनांक १६ जानेवारीला १०० लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून पुन्हा २८ दिवसानंतर दुसऱ्या लसीचा डोस देण्यात येणार आहे .