श्रीराम मंदिराच्या संपर्क कार्यालयाचे कळंबोलीत उदघाटन : नगरसेवक हरेश केणी यांनी केली राम मंदिरासाठी १ लाख रुपयांची मदत
कळंबोली : प्रतिनिधी
अयोध्यातील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील मंदिराच्या उभारणीचा आरंभ झालेला असून या करिता सर्वस्थरावरून आलेल्या निधीतून या मंदिरासाठी हातभार लावला जात आहे .
कळंबोली याठिकाणी मकर संक्रातीचे औचित्यसाधून संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले .मंदिर समिती कळंबोली चे नगर अभियान प्रमुख संतोष मोकल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी शांताराम महाराज खानावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . विजय वेदपाठक यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीदरम्यान झालेल्या संघर्षाची महिती दिली .
यावेळी भाजप नगरसेवक हरेश केणी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद , राष्ट्रीय स्वयंसेवक , भारतीय जनता पार्टी त्याच प्रमाणे कळंबोलीतील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता