छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी प्रसाद रंगीले यांची निवड
कळंबोली : प्रतिनिधी
जय बजरंग ग्रुप, दिशा परिस्पर्श सामाजिक संस्थचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद रंगीले यांची छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे या निमित्त त्यांना त्यांच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छा विविध स्थरावरून देण्यात येत आहेत.
कळंबोलीतील त्यांचे हितचिंतक व कट्टर समर्थक पैलवान बापू माने यांच्या वतीने कळंबोली या ठिकाणी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कळंबोलीतील राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जोपासत मागील काही काळापासून गोर गरिबांच्या मदतीसाठी जय बजरंग ग्रुप चे संपूर्ण पदाधिकारी तसेच कार्यकारणी यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
यासर्व कामाची दखल संस्थेचे अध्यक्ष प्रसाद रंगील यांना आता मोठी जबाबदारी मिळाली असून या संधीच सोनं नक्की करणार असे रंगील म्हणाले .
आयोजित सत्कार सोहळ्या निमित्त प्रसाद रंगीले फॅन वर्गा प्रमाणे शहरातील विविध पुढाऱ्यांनी प्रसाद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी
प्रकाश महानवर , नवनाथ धायगुडे,संतोष वर्तक, बालाजी शेठ गंगनमले, गोरख मुटके, सुधीर ठोंबरे,विशाल बाबर,तेजस जाधव, विकी लोहार, विकी सिंग, सत्यवान पडळकर,दीपक माने,बलराज सिंग, आधी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते .