शिवसेनेत लवकरच मेगा भरती : प्रदीप ठाकूर
कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली रोडपाली परिसरातील युवकांनी नुकताच विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेत काही दिवसांपूर्वी जाहीर प्रवेश केला या प्रवेशानंतर पनवेल तालुक्यातील शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी बोलून दाखवले तर आम्ही काही दिवसांतच शिवसेनेमध्ये मेगा भरती करणार असून काही इतर पक्षाचे नामचीन नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या गौप्यस्फोट प्रदीप ठाकूर यांनी केलेला आहे.
त्यामुळे भविष्यात पनवेल मध्ये राजकिय उलथापालथ पनवेलकरांना पहावयास मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांच्या नेतृत्वाने आम्ही शिवसेनेचा पाया मजबूत करणार असल्याचे ठाकूर म्हणाले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूला ठेवून मनगटात शिवबंधन धारण करून प्रदीप ठाकूर यांनी शिवसेने मध्ये प्रवेश केल्यानंतर या पक्षाच्या पक्ष वाडी करता तळमळीने सध्या ते काम करत आहेत लवकरच इतर राजकीय पक्षांची काही मंडळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याने ही मंडळी नेमकी कोण? हे पाहणे आता गरजेचे राहणार आहे.