कळंबोलीत भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

कळंबोलीत भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन 

पनवेल : प्रतिनिधी 

     कामगार नेते शिवाजी पाटील यांच्या भारतीय जनता माथाडी कामगार  संघटनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन कळंबोली महावीर प्लाझा याठिकाणी नुकतेच करण्यात आले कळंबोली भाजपाचे जेष्ठ नेते कै राजेंद्र बनकर यांचे चिरंजीव सिद्धेश बनकर यांच्या वतीने या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर , माजी सभापती अमर पाटील, बबन मुकादम हरेश केनी , राजेंद्र शर्मा , कमल कोठारी , नितीन काळे ,देविदास खेडकर , रवी पाटील यांच्या सह असंख्य कार्यकर्ते व माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

 कळंबोली भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कै राजेंद्र बनकर यांच्या आठवणींना यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उजाळा दिला यावेळी श्रीमती बनकर काकी यांना अश्रू अनावर झाले होते बनकर काका यांना श्रद्धांजली वाहून कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी सिद्धेश बनकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद देण्यात आले .   बनकर कुटुंबीयांच्या मागे आम्ही सदैव खंबीर उभे राहणार आहोत. असे उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणातून सांगितले . माथाडी कामगारांना त्यांच्या कार्यालयी कामकाजासाठी ठाणे , मुंबई या ठिकाणी जावे लागत  त्यामुळे कामगारांचा वेळ व खर्च देखील होत  म्हणून कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी युनियन चे कार्यालय कळंबोली या ठिकाणी असणे गरजेचे आहे असे  स्वप्न राजेंद्र बनकर यांचे होते व ते स्वप्न त्यांचे चिरंजीव युवानेते सिद्धेश बनकर  हे पूर्ण करण्याचे धाडस करून यशस्वीरीत्या वडिलांच्या समाजकार्याचा गाडा पुढे सरकवत  आहेत  .
महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0