रक्तदान शिबिराचे आयोजन : विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा पुढाकार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

रक्तदान शिबिराचे आयोजन : विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा पुढाकार


 रक्तदान शिबिराचे आयोजन :

विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा   पुढाकार 

 

 कळंबोली : प्रतिनिधी

विश्वहिंदू परिषद बजरंग दल  कळंबोली प्रखंडातील खिडुकपाडा येथिल श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले

कार्यक्रमात गुरुनाथजी मुंबईकर यांना रोटरी क्लब खारघर च्या वतीने कोविड योद्धा म्हणून यावेळी गौरवण्यात आले.

  विश्व हिंदू परिषद कुलाबा जिल्ह्याचे मंत्री  रमेश मोगरे, कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे,सुभाषजी कडव, महिंद्र पाटील व तळोजा, तोंडरे,कळंबोली,नावडे,कामोठे सर्व समितीचे पदाधिकारी यांचा यावेळी सहभाग लाभला होता.

   डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्यामार्फत डॉक्टर प्रसाद कुलकर्णी व  राजेश पाटील यांच्या प्रमुख नियोजनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  खिडुकपाडा ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला 

कार्यक्रमासाठी गुरुनाथ पाटील (भोजन) विनोद पाटील,निलेश भोईर,राहुल उलवेकर,रोहिदास ठाकूर,सुनील वासकर,अमर उलवेकर व चेतन उलवेकर , सिमा उलवेकर(चहा कॉफी) यमनप्पा मेहेगरी, सूरज भोईर (पाणी) व मधुकर गोंधळी व साई स्पोर्ट्स, गावदेवी मित्र मंडळ, वरदविनायक ग्रुप यांच विशेष योगदान लाभले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0