पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल प्रेसक्लबच्या अध्यक्ष पदी सय्यद अकबर यांची निवड करण्यात आलेली आहे . संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संस्थेचे संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, यामध्ये कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी चौथी वेळ अध्यक्षपदाची धुरा सांभाळून आपल्या अध्यक्षपदाचा चौकार फटकविला आहे. तर दुसरीकडे पत्रकार राज भंडारी यांची संघटनेच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पत्रकार सुमेधा लिम्हण यांनी बोलताना पनवेल प्रेस क्लब बाबत कृतज्ञता व्यक्त केली, त्या म्हणाल्या आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले काम करीत आहेत, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रातही महिलांना बातम्या बनविण्या पर्यंत मर्यादित ठेवले जात होते. मात्र पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्हाला पदे देवून आमचा तसेच समस्त महिला प्रवर्गाचा सन्मान केला आहे. पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सय्यद अकबर, कार्याध्यक्ष पदी प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्षपदी गणपत वरागडा, देविदास गायकवाड, भरत कुमार कांबळे, सरचिटणीस पदी राज भंडारी, सह चिटणीस पदी आप्पासाहेब मगर, विकास पाटील, खजिनदार पदी अनिल राय, संघटक पदी साहिल रेळेकर, सह संघटक पदी संतोष वाव्हळ, सल्लागार पदी संतोष घरत, महिला आघाडी प्रमुख सुमेधा लिम्हण, सहप्रमुख धनश्री सट्टा, प्रसिद्धी प्रमुख सनिप कलोते तर सदस्यपदी दीपक पळसुले, क्षितिज कडू, विशाल सावंत, रविंद्र चौधरी, जितेंद्र नटे, प्रदीप ठाकरे, असीम शेख, साबीर शेख, शंकर वायदंडे, राजेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण या सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.