जाहिरातींसाठी पर्यावरणाचा घोट
*कळंबोलीत होर्डिंगच्या आड येणाऱ्या झाडांचे बलिदान
*कळंबोली : प्रतिनिधी*
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या प्रदूषणाचा विषय चर्चेत असताना आता दूषित वायूचे प्रदूषण आटोक्यात आणणाऱ्या वृक्षांवरच विषप्रयोग करून त्यांना संपुष्टात आणण्याचा प्रकार घडलेला आहे .
महामार्गालगत असलेल्या मोठ्या जाहिराती होर्डिंग च्या आड येणाऱ्या मोठमोठ्या झाडांना कोणत्यातरी प्रकारे विषारी रसायनाच्या माध्यमातून त्याचा समूळ नाश करण्यासाठी काही अज्ञात मंडळी सक्रिय झाले आहेत , त्यामुळे अशा झाडांच्या खोडांवर रासायनिक द्रव्याचा मारा करून ही झाडे मारली जात आहेत याबाबत सध्या एकच नाराजी कळंबोलीतील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे .
याबाबत कळंबोली विकास समितीचे प्रशांत रणवरे यांनी या प्रकाराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच याबाबत तक्रार देखील करण्यात आले आहे.
कळंबोली प्रमाणे पनवेल , नवीन पनवेल याठिकाणी मोठमोठ्या रेसिडेन्शिअल इमारती उभे राहत आहेत त्याचप्रमाणे मोठ्या व्यावसायिक जाहिराती झळकवण्यासाठी उभारण्यात येत असलेले होर्डिंग यावर जाहिराती प्रसिद्ध करण्याची मोठी स्पर्धा लागत आहे , मात्र या होर्डिंग आड येणारी वृक्ष यांची मध्यरात्री विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याच पुन्हा एकदा समोर आले आहे.
कळंबोली शहरांमधील शिवसेना शाखा या ठिकाणीदेखील काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झाडांवर विष प्रयोग करून या झाडांची विल्हेवाट लावण्यात आली होती होती .
या प्रकारानंतर झाडांचा जीव घेणारे अज्ञात कोण याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान संबंधित यंत्रणेला असून यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे .