सिडकोच्या विविध कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कडून पाहणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सिडकोच्या विविध कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कडून पाहणी

 कळंबोलीत सिडकोच्या विविध कामांची 

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कडून पाहणी 

पनवेल(प्रतिनिधी)
 कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून होणार्‍या विविध कामांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी   पाहणी केली. ही कामे वेळेत पूर्ण करा, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी अधिकार्‍यांना सूचित केले. 
 कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोकडून केली जात असलेली कामे ही अत्यंत संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. ही बाब सिडको अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा,  नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चाचे गोविंद झा, अमर ठाकूर, भाजप नेते अशोक मोटे, प्रकाश शेलार, सिद्धेश बनकर , शितेंद्र शर्मा, प्रकाश महानवर, जमीर शेख, अजहर शेख, केशव यादव, दिलीप बिस्ट, विलास शिते, मच्छींद्र कुरूंद, कविता गुजर, सिडकोचे अधिकारी श्री. रोकडे,  बनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकार्‍यांसमवेत रस्ते, गटारे तसेच स्मशानभूमीची पाहणी केली. आराखड्यानुसार काम करीत असताना ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तसेच ज्या परिसरात पाणी साचत आहे ती कामे दिवाळीपूर्वी कामे झाली पाहिजेत, अशी सूचना आमदार ठाकूर यांनी अधिकार्‍यांना केली.  




महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0