ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची करवाढ करू नये : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची करवाढ पाच वर्षे करू नये अशी भूमिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे घेतली. पनवेल महानगरपालिकेची अर्थसंकल्पाची विशेष सर्वसाधारण गुरूवार २२ रोजी Webex App. वर ऑनलाईन पध्दतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथुन आयोजीत केली गेली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली . मालमत्ता कर नगरपालिका हद्दीपेक्षा पनवेल महापालिकेला ग्रामीण विभागातून जास्त कर जमा होत असेल तर त्याना सुविधा देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील गावाना ५ वर्षे मालमत्ता कर वाढविणार नाही असे महापालिकेकडून सांगितले जात होते. जो कर गावाना ग्रामपंचायतकडून आकारला जात होता तोच कर ५ वर्षे आकारला जाईल असे सांगितले जात होते. मात्र सध्या हे बदल कशासाठी केला जात आहे. खारघर ग्रामपंचायतमधून करोड़ो रूपये महापालिकेला मिळाले. मात्र तशा सुविधा त्याना मिळाल्या नाहीत. 90 टक्के भाग ग्रामीण भाग आणि सिडकोचा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. जुनी करवाढ सुरू ठेवावी आणि ग्रामीण भागात विकास झाला असे वाटत असेल तरच करवाढ करावी असे मत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी व्यक्त केले.