मा.खा.रामशेठ ठाकूर "कोरोना देवदूत" पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी
कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना सढळ हस्ते मदत करणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना आज (बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे 'कोरोना देवदूत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दैनिक शिवनेरच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
मा. खा.रामशेठ ठाकूर यांची दानशूर व्यक्ती म्हणून ओळख आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी विविध प्रकारे गरजूंना मदतीचा हात देत सामाजिककार्य जोपासले आहे .
आज देण्यात आलेल्या पूरस्कारावेळी आमदार प्रशांत ठाकूर , परेश ठाकूर यांच्यासह अरुण भगत , वाय ,टी देशमुख उपस्थित होते .