पनवेल महानगरपालिका परिसरातील लोकडाऊन शिथिल - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका परिसरातील लोकडाऊन शिथिल

पनवेल महानगरपालिका परिसरातील लोकडाऊन शिथिल .

पनवेल : प्रतिनिधी
लढवया रोखठोक

  पनवेल महानगरपालिका हद्दीतील सुरू असलेल्या लॉकडाऊन आता शिथिल करण्यात आलेला आहे .
 नागरिकांची या वाढत्या लॉकडाऊन मुळे डोकेदुखी वाढली होती या अनुषंगाने सामाजिक , राजकीय मंडळी व सोशल मिडियावर या लॉक डाऊन बाबत तक्रारी वाढल्या होत्या याबाबत पनवेल महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी हा लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे .

  पनवेल परिसरात लॉकडाऊन बाबत करण्यात आलेली सुधारणा खालील प्रमाणे .

१) अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, मासळी, उपरोक्त काळात दररोज सकाळी ०९.०० ते चिकण / मटण, किराणा व इतर जीवनावश्यक सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. सामाजीक वस्तूंची दुकाने अंतर (सामाजिक अंतर) ठेवून काऊन्टर सेल सुरू ठेवता येईल. सदर नियमांचे उल्लघंन केल्यास दुकाने सील करण्यात येतील.

२) दुध डेअरी आस्थापना
सकाळी ०५.०० ते सायंकाळी ७.०० वाजेप्यंत सुरू राहतील.


३) औषधांची दुकाने व चष्म्याची दुकाने (फक्त औषधे व चष्मे विकण्याची मुभा असेल)
 अ) दररोज औषधाची व चष्म्याची दुकाने सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत भोतिक अंतराचे  पालन करून सुरू राहतील.
 ब) रूग्णालयातील (ज्या ठिकाणी आंतररूग्ण विभाग सुरू आहे अशा ठिकाणी) औषधाची दुकाने २४ तास किंवा त्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याची मुभा असेल.
 क) २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असणाऱ्या औषधी दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.
  ४) स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, बांधकाम फक्त होम डिलिव्हरी साहित्य साधन सामुग्री, स्टील, सिमेंट ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे विक्री इ. उदा.ताडपत्री. प्लास्टिक बंदी नसलेले  प्रावरणे, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री, कॉम्प्युटर- मोबाईल विक्री, मोबाईल गॅलरी.
गॅस/कुकर मिक्सर/एसी दुकाने, भांड्यांची दुकाने सोमवार ते गुरुवार सकाळी ९.०० ते सायंकाळी ५ फक्त होम डिलिव्हरी राहतील .

५) पिठाची गिरणी
दररोज सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
 ६) रेस्टॉरंट व किचन (फक्त होम डिलिव्हरी )
सकाळी १० ते रात्री१०
 ७) वृत्तपत्रे विक्री दुकाने (एजन्सी) सकाळी ७.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत सामाजिक अंतर चे पालन करून सुरू राहतील.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0