पनवेलमहापालिका मुख्यालय ३ दिवस बंद
निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपाययोजना
पनवेल / लढवय्या रोखठोक
जगभर कोरोना विषाणु प्रकोप वाढत असुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणु संसर्गजन्य रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
मनपा अधिनियमाच्या कलम ३१९ नुसार भयंकर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, आयुक्त यांना खास उपाय योजना
करण्याचे अधिकार आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील काही कर्मचारी व कोरोनासाठी स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षातील काही जबाबदार कर्मचारी यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे, शुक्रवार, शनिवार, रविवार दिनांक १०,११ व १२ जुलै २०२० हे तीन दिवस महानगरपालिकेचे मुख्यालय निर्जतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे .
मात्र परिसरातील काम करणारे सर्व आरोग्य केंद्र सुरू राहणार असून कोरोना नियंत्रणासाठी सर्व पथके व महानगरपालिकेमधील कार्यरत अधिकारी त्यांचे काम दूरध्वनीवरून किंवा घरी राहून
पहिली जाणार आहेत .
मुख्यालयातील कार्यरत सर्व विभागांची व्यवस्था खालील प्रमाणे केली जाणार आहे .
१ ) आयुक्त कार्यालय
अति आयुक्त कार्यालय
आयुक्त व अति आयुक्त यांचे स्विय सहाय्यक
यांची व्यवस्था नाट्यगृहाच्या व्हीआयपी कक्षात करण्यात येत आहे .
२) परवाना विभाग टॅक्स विभाग विवाह नोंदणी विभाग
पाणी कर संकलन विभाग मालमत्ता विभाग यांची प्रभागसमिती कार्यालय ड येथे करण्यात आली आहे .
३) वॉर रुम : नाट्यगृह तिसरा मजला या ठिकाणी करण्यात येत आहे .
४) लेखाधिकारी कार्यालय
लेखा विभाग : रंगमंच ड्रेसिंगरुम नंबर १
५) लेखा परिक्षण विभाग
विधी विभाग : रंगमंच ड्रेसिंगरुम नंबर २
६) उपायुक्त कार्यालय १ व२ सहा आयुक्त कार्यालय आस्थापना विभाग यांची व्यवस्था नाट्य व्यवस्थापण कार्यालय येथे करण्यात आली आहे .