आशा वर्कर यांना प्रतिदिन ५०० रुपये मानधन द्या : रवींद्र भगत यांची मागणी
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा प्रधुर्भाव वाढत आहे या कोरोना काळात आशा वर्कर हे कोरोना रुग्ण पोसिटीव्ह सापडल्या पासून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे मात्र त्यांना तुटपुंजा पगारावर काम करावं लागत आहे . त्यामुळे या आशा वर्करना प्रतिदिन ५०० रुपये इतके मानधन देण्याची मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनीं केली आहे .
याबाबत त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना ईमेल द्वारे पत्रव्यवहार केला आहे .