*शरद पवारांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र युवा मोर्चा आक्रमक :
"श्रीराम" लिहिलेले
१००० पत्र पवारांकडे रवाना*
कळंबोली : प्रतिनिधी
प्रभू श्रीरामचंद्रा बाबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राम मंदिराबाबत व्यक्त केलेल्या भावनेनंतर
संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . महाराष्ट्र युवा मोर्च्यांच्या वतीने या वक्तव्याचा निषेधार्थ जय श्री राम लिहिलेले १००० पत्र शरद पवार यांना पाठविण्यात आले आहेत .
महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली मंडळ युवा मोर्चा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले १००० पत्रक पोस्ट द्वारा त्यांच्या मुंबईच्या निवास्थानी पाठवण्यात आले आहेत.
शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नाकारात्मक कोणी बोलणार असेल तर प्रभू रामाची आठवण देण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा करत राहणार.
असे मत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमर ठाकूर, जमीर शेख, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद झा, श्रीकांत ठाकूर, गौरव नाईक, अझर शेख, दीपेश परब, निशान गिल, जोबान सिंग व इतर युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.