सुअस्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सुअस्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध

सुअस्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध

*कळंबोली येथे १०० बेड असलेल्या वेगळ्या कोविड केंद्राची सुविधा*                                                                                                           
नवी मुंबई : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
   सुअस्थ हॉस्पिटल हे ३५० बेड्स असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स हेल्थकेअर नुकतेच कार्यरत झाले आहे आणि नवी मुंबईतील रहिवाशांसाठी या हॉस्पिटलची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.   या हॉस्पिटलमध्ये अधिक रुग्ण भरती करण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा आहे. हॉस्पिटलमध्ये रूग्णांना उत्तम सेवा दिली जाते असा विश्वास येथील प्रशासनाने व्यक्त केला आहे.याठिकाणी
 डॉ.संजीव कनोरिया हे युनायटेड किंगडम मधील  हेल्थकेअर उद्योजक व लिव्हर ट्रान्सप्लाण्ट सर्जन आहेत. .या विभागातील कोविड केअर सुविधांची आत्यंतिक गरज लक्षात घेता, सुअस्थ हॉस्पिटलने वेगळे १०० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र हॉस्पिटल मधील इतर विभागांपासून वेगळे असून त्याचे प्रवेशद्वारदेखील वेगळे आहे.पनवेल महानगरपालिकेने  सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे केंद्र कार्यरत आहे.
 डॉ. संजीव कनोरिया यांच्या म्हणण्यानुसार, ''आम्हाला नवी मुंबई,पनवेल शहरातील तसेच रायगड जिल्ह्यातील रहिवाश्यांना, आमची सेवा देण्याचा आनंद होण्यासोबत सन्मानित वाटत आहे. सुअस्थ हॉस्पिटलचा सर्वांसाठी हेल्थकेअर सेवा, सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे असे सांगतात
   विभागातील प्रगत आरोग्यसेवांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याचादेखील उद्देश आहे.आमचे अनुभवी कर्मचारी, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान, किफायतशीर दर,विचारपूर्वक केलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रतिबंध,केअर व काळजीप्रती एकीकृत दृष्टिकोन,सुअस्थ हॉस्पिटलला इतरांपेक्षा खास बनवतात.
 सुअस्थचे वेगळे प्रसूती संकुलदेखील आहे.या संकुलामध्ये वेगळेऑपरेशनथिएटर,एनआयसीयू (निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट) आणि वेगळ्या डिलिव्हरी व खाजगी रूम्स असणार आहेत. सुअस्थची इंटीरिअर डिझाईन सध्याच्या महामारीसारख्या उध्दभवलेल्या अवघड घटनांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. म्हणूनच यामध्ये वेगवेगळे प्रवेशद्वार बनवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0