पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एका महिन्यात कोरोनाचे :तीन पटीने रुग्ण वाढले - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एका महिन्यात कोरोनाचे :तीन पटीने रुग्ण वाढले

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एका महिन्यात कोरोनाचे 

  तीन पटीने रुग्ण वाढले : कोरोनाचे गांभीर्य महत्वाचे


पनवेल : लढवय्या रोखठोक
 प्रतिनिधी

 पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात उद्या ३ जुलै रात्री ९ वाजल्यापासून १३ जुलै पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे .
  त्यामुळे आता हा कोरोनाचा आकडा या १० दिवसात तरी कमी होण्याची आशा आहे .
 कारण गेल्या १ महिन्यांच्या कालावधीत कळंबोली , पनवेल , नवीन पनवेल , तळोजा ,खारघर शहरातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झालेली आहे .
  याचा अर्थ शहरातील नागरिकांचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होत आहे .
 ३० मे च्या नंतर लॉकडाऊन उठल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या  तीन पटी पेक्षा जास्त वाढलेली आहे हा आकडा  अतिशय घातक असून अवघ्या ३० दिवसात ६३७ नवीन रुग्णांची ची नोंद झालेली आहे.
 मुख्य म्हणजे गेल्या ३ दिवसापासून लागोपाठ रूग्णाच्या संख्ये ने सेंचुरी मारली आहे .
३० मे २०२० रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७१ होती . यामध्ये हे सर्वाधिक रुग्ण कामोठे येथील ६१, खारघर मधील ३७ , नवीन पनवेल मध्ये ३३ व कळंबोली मध्ये ३१ रुग्ण संख्या होती.
  त्याशिवाय ३० मे रोजी जुन्या पनवेल मध्ये ते अवघे ८ व तळोजा मध्ये केवळ १ रुग्णाची नोंद झालेली होती. त्यानंतर
 लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत १७१ असलेली रुग्णसंख्या ही ८०८ पर्यंत पोहोचली आहे हा उच्चांक गंभीर स्वरूपाचा म्हणता येईल म्हणजेच एकूण ६३७ नवीन रुग्णांची ची भर या एका महिन्याच्या कालावधीत झालेली आहे.
 ही वाढ अतिशय भयानक असून  सरासरी वाढीची टक्केवारी ही तीन पटी पेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे. ही निश्चितच गंभीर बाब असून या दृष्टिकोनातून पनवेल महापालिका आयुक्तांनी लाॅकडाऊन चा निर्णय ३ जुलैपासून ते १३ जुलैपर्यंत घेतलेला आहे हे तो अतिशय योग्य आहे. मात्र याचा किती फरक पडतो हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
 त्यामुळे निश्चितच रुग्ण संख्या वाढीवर काही प्रमाणात अंकुश राहू शकतो. अशी आशा करावी लागेल.  या वाढीसाठी प्रशासन व यंत्रणेला संपूर्ण दोष देता येत नसून विविध सार्वजनिक कार्यक्रमातून झालेला लोक सहभाग, फिजिकल डिस्टंसिंग चा उडवलेला फज्जा,मास्क किंवा रुमाल न वापरण्याची प्रवृत्ती व स्वच्छतेच्या सवयींचा अभाव, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कमतरता याचा सुद्धा कमी-अधिक प्रमाणात रुग्णवाढीच्या कारणासाठी सहभाग आहे .
  लॉकडाऊन शिथिल होण्याच्या आधी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस व रुग्णाच्या संसर्गात आलेल्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. परंतु त्यानंतर ३० मे च्या नंतर  लॉक डाऊन ची शिथिलता व कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत आदेशित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी , ऑफिस पर्यंत  प्रवास करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात वाहतुकीची सोय केल्यामुळे व वाहतुकीची सोय पुरेशी नसल्यामुळे झालेल्या गर्दीचे रूपांतरण वाढीव आकडेवारी च्या स्वरूपात आज दिसून येत आहे.
  बस मध्ये प्रवास करण्यासाठी उडालेली झुंबड, लग्नप्रसंगी दिलेली पार्टी, हळदीच्या कार्यक्रमात झालेला सहभाग व इतर लहान मोठ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने  लोकांचा सहभाग वाढला होता . या एकत्रित जमावाने योग्य सावधगिरी न बाळगल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या एवढी झपाट्याने तीन पट वाढलेली आहे. उद्या परवापासून कदाचित नागरिक लॉकडाऊन च्या कठोर अमलबजावणी मुळे मोठ्या संख्येने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास घराबाहेर पडतील. तेव्हा त्यांनी रुग्णसंख्या वाढीच्या या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून पूर्ण सावधगिरी घेणे आवश्यक आहे. काही रुग्ण घरी बाहेरून संसर्ग घेऊन आलेले होते त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचा धोका हा लोकडाऊन मध्ये सुद्धा राहणार आहेच. म्हणून ज्या विशिष्ट इमारतीमध्ये रुग्ण संख्या कौटुंबिक घटकांमध्ये एकापेक्षा जास्त अशी लागण झालेल्या स्वरूपात दिसून येत आहे हे त्या इमारतीमध्ये विशेष तपासणी घेणे अनिवार्य झालेले आहे. अन्यथा दवाखान्यात उपचार घेत असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबात सुद्धा संसर्ग वाढण्याची शक्यता होऊन रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणे नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी काही विशिष्ट इमारतीमध्ये हे आरोग्याच्या संदर्भात खबरदारी न घेतल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते.
   लोकांनी अधिक सावधराहून या सगळ्या वाढीच्या दरावर सामूहिक प्रयत्नाने कसे नियंत्रण ठेवता येईल याबाबत निश्‍चितपणे विचारमंथन करणे आवश्यक आहे.
 लॉकडाउन चा कालावधी संयुक्तपणे कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी महत्त्वाचा असून सर्वांनी प्रशासनासोबत सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. या प्रसंगी सर्वांनी आपली वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी चे पालन कठोरतेने  केल्यास निश्चितपणे लॉक डाऊन च्या कालावधीत व त्या नंतर सुद्धा आपण या विषाणूंचा संसर्ग टाळू शकतो.  त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन लढवय्या रोखठोक यांच्यावतीने करण्यात येत आहे .
कळंबोली क्षेत्रात झालेली रुग्ण वाढ ही ३६८ टक्के  तर त्या खालोखाल नवीन पनवेल मध्ये ३४५ टक्के एवढा वाढीचा दर आहे. खारघर मध्ये २८१ टक्के तर कामोठे ची वाढ ही १३१ टक्के आहे .सर्व साधारण वाढीचा सरासरी दर हा पनवेल महानगरपालिकेसाठी ३७२ टक्के एवढा जास्त आहे त्यामुळे भविष्यात जर आपण स्वतःवर निर्बंध लावले नाही सा  सार्वजनिक कार्यक्रम  तसेच लग्न , हळद यासारख्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जमा होत राहिलो तर मात्र कोरोनाची रुग्णवाढ किती भयावह  होणार आहे याची कल्पना न केलेली बरी  .

                                                                                                  *शैलेश .शा. चव्हाण*

                                                                                       *मुख्यसंपादक लढवय्या वृत्त समूह*

 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0