कोविड रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्या : सुदाम पाटील यांची मागणी . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कोविड रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्या : सुदाम पाटील यांची मागणी .

कोविड रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्या : सुदाम पाटील यांची मागणी .


कळंबोली : प्रतिनिधी
   लढवय्या रोखठोक
 
  पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची  दिवसेंदिवस होणारी वाढ  लक्षात घेता नवीन कोविड सेंटर उपलब्ध करण्यासाठी पनवेल महानगरपालिका सज्ज झाली असून त्याबाबत उपाययोजना केली जात आहे मात्र कोविड सेंटर मध्ये होणारी रुग्णाची गैरसोय व त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेसचे पनवेल कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी केली आहे .
परिसरात कोरोना रुग्णांबाबत दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने  केलेल्या मागणीनुसार दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले आहे.  प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हा निर्णय योग्य आहे.
 मात्र कोरोना रुग्णांवर व्यवस्थित व योग्य उपचार करण्यासाठी कोविड हॉस्पिटल वाढवणे गरजेचे आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटल हे दोनच कोविड रुग्णालय आहेत. रुग्णांची संख्या पाहता ते कमी पडत आहेत. त्याचबरोबर याठिकाणी ऑक्सीजन बेड व वेंटिलेटर ची कमतरता आहे.
 परिणामी ऑक्सिजन  कमी झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करता येत नाहीत.    खाजगी रुग्णालयात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.
 काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसते. या सर्व पार्श्वभूमीवर आणखी कोविड रुग्णालय जाहीर करावेत.
 सध्या कार्यरत असलेल्या कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजन बेड आणि वेंटिलेटर ची सोय करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.       पनवेल महानगरपालिकेने हद्दीतील खाजगी रुग्णालय ताब्यात घेऊन तिथे कोविड हॉस्पिटल सुरू करावेत अशी मागणी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0