विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार कुटुंबांना
अर्सनिक अल्बम ३० मास्क आणि सॅनिटायझरचे होणार वाटप.
पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास नारायण फडके यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै २०२० रोजी पाच हजार कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे.
होमिओपॅथिक औषधे अर्सेनिक अल्बम ३० कोरोना व्हायरस संक्रमणापासून आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरत आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि रिसर्च कौन्सिलने कोरोनाव्हायरस संक्रमण रोखण्यासाठी एक विकल्प होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम ३० घेण्याचा सल्ला जनहितार्थ जारी केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै २०२० रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिपळे, नेरे जिल्हा परिषद विभाग तसेच करुणेश्वर आश्रम वृद्धाश्रम भानघर, स्नेहकुंज आधारगृह वृद्धाश्रम नेरे आणि सील आश्रम वांगणी येथे अर्सेनिक अल्बम ३० आणि सॅनिटायझरचे पाच हजार कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहे. आपला वाढदिवस धूम धड़ाक्यात साजरा न करता अर्सनिक अल्बम ३० मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून करणार असल्याने विलास फडके यांचे कौतुक केले जात आहे.