*कळंबोलीत भरधाव ट्रकची तीन वाहांना धडक : जीवित हानी टळली* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*कळंबोलीत भरधाव ट्रकची तीन वाहांना धडक : जीवित हानी टळली*

*कळंबोलीत भरधाव ट्रकची  तीन वाहांना धडक : जीवित हानी टळली*
कळंबोली : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
  कळंबोली परिसरात  एका भरधाव येणाऱ्या ट्रकच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पार्क असलेल्या एका चारचाकी वाहनाला तसेच एका रिक्षाला एका ट्रकला जोरदार धडक दिल्याचा प्रकार कळंबोली शहरात घडलेला आहे सुदैवाने या अपघातात कोणत्या प्रकारची जीवितहानी झालेली नसून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
  ता . २९ रोजी रात्री ८ च्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच ४२ बीबी ५०२९ हा ट्रक
कळंबोली शहरात मस्जित ते कळंबोली फायरब्रिगेट मार्गे भरधाव जात होता कळंबोली नीलकंठ मेडिकल जवळ उभीअसलेली इर्टीगा
गाडी क्रमांक  एम एच ४६ बीबी ७३७४ हिला धडक दिली त्यानंतर
त्याच ठिकाणी असलेली रिक्षा एम एच ४६ एसी ०८५६ हिला देखील धडक देऊन स्टील मार्केट याठिकाणी उभ्या असलेला टेम्पो क्रमांक एम एच ४७ इ  ३२५४ या वाहनाला धडक देऊन विजेच्या पोल वर ठोकर दिल्याचा विचित्र अपघात घडला आहे .
  संबंधित ट्रक चालक शंकरचिक बडाईक झारखंड याच्यावर या अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
  कळंबोली शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस लहान मोठ्या अवजड वाहने , टेम्पो , बस वाहनांची घुसखोरी पाहावयास मिळत आहे मुख्य रस्त्याने नंतर आता थेट शहरांमधल्या गल्लीबोळ्यात देखील ही  वाहने दिवस-रात्र उभी केली जातात त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.
कळंबोली शहरात गेल्या काही महिन्यांपासून  वाहने शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांवर पार्क केल्याचे पहावयास मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे . याबाबत कळंबोली वाहतूक शाखा , कळंबोली पोलीस व पनवेल प्रादेशिक विभागाने योग्य अशी कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून मागणी केली जात आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0