नगरसेवक अरविंद म्हात्रेंचा दानशूरपणा ! : चक्रीवादळाच्या आर्थिक संकटात १ लाख रुपयांची मदत - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नगरसेवक अरविंद म्हात्रेंचा दानशूरपणा ! : चक्रीवादळाच्या आर्थिक संकटात १ लाख रुपयांची मदत

नगरसेवक अरविंद म्हात्रेंचा दानशूरपणा ! :

चक्रीवादळाच्या आर्थिक संकटात १ लाख रुपयांची मदत 

कळंबोली : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

  पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आपल्या दिलदार पणाची छबी समोर ठेवली आहे. 
    रायगड जिल्ह्यासह कोकण परिसरात धडकलेल्या महाभयंकर चक्रीवादळाच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही पोकळी भरून काढण्याच्या विचारातून
  १ लाख रुपयांची मदत रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे .
 त्यांच्या या दानशूर निर्णयाचे कौतुक सध्या सोशल मीडिया सह पनवेल तालुक्यात केले जात आहे .
   शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कोरोनाच्या संकटात अनेकवेळा नावडे तळोजा भागातील गरजूंना मदतीचा हाथ दिलेला असून नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी ओळखून त्यांनी योग्य अशी मदत पोहचवन्याचा प्रयत्न करत आहेत . त्यातच आज पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्यासह कोकणावर चक्रीवादळाच्या महाभयंकर नैसर्गिक संकटामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची पोकळी भरून काढण्यासाठी १ लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0