उघड्या नाल्यात अडकलेल्या गाईला जीवदान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उघड्या नाल्यात अडकलेल्या गाईला जीवदान

*उघड्या नाल्यात अडकलेल्या गाईला जीवदान : कळंबोली अग्निशमन यंत्रणेची  कामगिरी*
*कळंबोली : लढवय्या रोखठोक*
  *संतोष मोकल*


कामोठे मानसरोवर याठिकाणी उघड्या गटारात एक गाय गेल्या काही तासांपासून अडकून पडली होती मात्र अग्निशामक यंत्रणेच्या अथक परिश्रमातून या मुक्या जनावराला बाहेर काढून याची सुखरुप सुटका करण्यात कळंबोली अग्निशामक यंत्रणेला यश प्राप्त झाले आहे.
  कामोठे येथील मानसरोवर याठिकाणी असलेल्या रेल्वे लाईन शेजारी असलेल्या एका उघड्या गटारात गाय पडली होती याची माहिती मिळताच कामोठे पोलिसांच्या वतीने कळंबोली अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते यावेळी कळंबोली अग्निशामक दलाचे सुनील सोनवणे व यांच्या संपूर्ण पथकाने घटनास्थळी जाऊन अथक परिश्रमातून या गाईची सुखरूप सुटका केली व गाईच्या जीव वाचला आहे .
  कामोठे शहरात विविध ठिकाणी पावसाळी पाण्याच्या गटारांवर झाकणे नसल्याने अशा वारंवार घटना घडत असतात सुदैवाने जीवावर कोणतीही घटना बेतली नाही मात्र याबाबत योग्य अशी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे . 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0