कळंबोली पोलीस ठाण्यावर कोसळले वृक्ष
कळंबोली : प्रतिनिधीआज झालेल्या वादळामुळे शहरात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठे नुकसान झालेले आहे . यामध्ये इमारतीवरील पत्रे , वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
कळंबोली पोलिस ठाण्याच्या आवारात देखील झालेल्या वादळामुळे आवारात असलेले वृक्ष पोलीस ठाण्याच्या इमारतीवर कोसळून मोठे नुकसान झाले
इमारतीवरील पत्र्यांची संपूर्ण नासधूस झाली असून इमारतीचे नुकसान झालेले आहे सुदैवाने जिवीत हाणी टळली आहे .
या घटने नंतर कळंबोली वपोनी सतीश गायकवाड यांनी अग्निशमन विभागाला कळवून वृक्ष हटविण्यात आले दरम्यान
पोलीस आयुक्त व पनवेल पोलीस उपआयुक्त यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची विचारपूस करून काळजी घेण्यास सांगितले .