कळंबोलीत नाले सफाईत हाथ सफाई ? - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत नाले सफाईत हाथ सफाई ?

कळंबोलीत नाले सफाईत हाथ सफाई ?

कळंबोली ; प्रतिनिधी


   कळंबोली शहरांमध्ये सध्या नालेसफाईचे पहिल्या पावसाने पितळ उघडे पाडले असून कळंबोली शहरातील नालेसफाई पूर्णपणे फोल ठरल्याचे उघड होत असल्याचे दिसू लागले आहे .
कोरोनाच्या तोंडावर शहरांमधील नालेसफाईची कामे ही असमाधानकारक असल्याचे आता दिसून येत आहे त्यामुळे नालेसफाई हातसफाई झाली आहे का ? असा सवाल उपस्थित होत  आहे .
   सध्या जगभरात कोरोना चे संकट ओढवलेले आहे त्यातच पावसाळा पूर्वीची नालेसफाईची कामे रखडण्याची चिंता वारंवार व्यक्त केली जात होती मात्र ठेकेदारांमार्फत करण्यात आलेली ही नालेसफाईची कामे जादूची कांडी फिरवल्यासारखे करण्यात आली आहेत . असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे .
  शहरातील फक्त आणि फक्त मुख्य रस्त्यांवरील पावसाळी पाण्याची गटारांच्या   तोंडावरचा नेहमीप्रमाणे गाळ काढून वेळ मारून नेल्याचा प्रकार सध्या कळंबोली शहरात पाहावयास मिळत आहे.
  बऱ्याच ठिकाणी गटारांमध्ये, नाल्यांमध्ये काढलेल्या मातीचे ढिगारे रस्त्यांवर तसेच पडून असल्याने या पावसामध्ये पुन्हा हा गाळ पाण्यावाटे नाल्यांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालेली असून यापासून रोगराई पसरण्याची देखील चिंता व्यक्त केली जात आहे .
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा या कोरोनाशी लढा देत असताना या कोरोनाच्या विषयाच्या पाठीमागे राहून कशीबशी ठेकेदाराने नालेसफाई पाठोपाठ यात हाथ सफाई देखील केल्याचे स्पष्ट दिसत असल्याने
    धक्कादायक प्रकार आता समोर येत असून याबाबत  नगरसेवक अमर पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे तर
  संबंधित नालेसफाईची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व ठेकेदारांवर कारवाई अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे  .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0