गोपीचंद पडळकरांवर कारवाई करा :पनवेल राष्ट्रवादीची मागणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गोपीचंद पडळकरांवर कारवाई करा :पनवेल राष्ट्रवादीची मागणी

पडळकरांवर कारवाई करा :पनवेल राष्ट्रवादीची मागणी 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
 
  भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार  निषेध व्यक्त केला जाऊ लागला आहे .
  विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली असून सोशल मीडियावर देखील त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न होत आहे .
 पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी पडळकरयांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात  आली आहे .
  पनवेल प्रांत कार्यालयात याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे . यावेळी राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे याच्या सह पनवेल मधील पदाधिकारीही उपस्थित होते .
   शरद पवार हे राजकारणातले जेष्ठ नेते असून  त्यांच्याबाबत बोलताना विचारपूर्वक बोलणे गरजेचं असताना पडळकर यांनी
 आपली मर्यादा सोडून जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे .
  एकीकडे कोरोनाच संकट असताना देशावर राज्यावर विदारक परिस्थिती असतांना देखील गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राजकारणात एकच चर्चा सुरू झाली असताना पडळकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे . 

 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0