पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे ९५ रुग्ण तर दोघांचा मृत्यू . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे ९५ रुग्ण तर दोघांचा मृत्यू .

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे ९५ रुग्ण तर दोघांचा मृत्यू .


पनवेल :  प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका परिसरात आज कोरोनाचा पुन्हा एकदा मोठा उच्चांक पाहायला मिळत आहे , आज एकूण ९५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद पनवेल महानगरपालिका क्षेत्रात झालेली असून २ जणांचा कोरोना ने मृत्यू झालेला आहे तर ७६ जण आज कोरोना ने बरे होऊन आपल्या घरी परतलेले आहेत.
 आजच्या कोरोनाच्या आकडेवारी नंतर पनवेल महानगरपालिका परिसरातील कोरोना बधिततांचा  एकूण आकडा १५३० वर पोहचला असून १०५५ जणांना आता पर्यंत बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
   गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचा मोठा उच्चांक दिवसेंदिवस वाढत आहे शहरांमधील लॉकडाऊन ची शिथिलता व त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून होत असलेली गर्दी हे या वाढत्या संख्येचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. पनवेल महानगरपालिका वेळोवेळी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात असून देखील हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पनवेल महानगरपालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे .
  आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जुना पनवेल शहरातील विविध विभागांमध्ये एकूण २५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर नवीन पनवेल शहरात एकूण १४ रुग्ण तसेच खांदा कॉलनी येथे १  कळंबोली येथे १०  कामोठे येथे २७ तर खारघर येथील एकूण १२ तर तळोजा येथे ५ रुग्ण अशा रुग्णांचा समावेश आहे .
  तर आज तळोजा व कामोठे येथील प्रत्येकी १ अशा  दोघांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0