कळंबोलीतील चिमुरडीचा कोरोनाने मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीतील चिमुरडीचा कोरोनाने मृत्यू

कळंबोलीतील चिमुरडीचा कोरोनाने मृत्यू

कळंबोली : प्रतिनिधी
 लढवय्या रोखठोक

  पनवेल परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे .  कोरोना विषाणूच्या मुळे पनवेल परिसरात एकूण या विषाणूने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अर्ध शतक (५० व्यक्तीचा मृत्यू) पूर्ण केलं आहे .
  आता पर्यंत मोठ्या वयाच्या व्यक्तींवर या कोरोनामुळे मृत्यू होत होता मात्र आज कळंबोलीतील एका ११ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू कोरोनाने झाल्याने एकच खळबळ उडाली आहे . पनवेल महानगरपालिकेने  या घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल परिसरातील नागरिकांना आव्हान केलं आहे .
  १० वर्षाच्या खालील मुलांनी बाहेर पडू नये त्याच प्रमाणे वयोवृद्ध ६० वर्षा वरील व्यक्तींना देखील घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आले आहे .
  कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींपासून घरात संसर्ग होण्याची संभावना असल्याने योग्य ती खबरदारी घेण्यातयावी असे सांगण्यात आले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0